महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना २०हजार सन्मान निधी मिळणार…

मुंबई: आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले मासिक २० हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुकर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्यावतीने मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांनी धन्यवाद दिले आहेत.

आर्थिक अडचण दूर करण्यासाठी शासनाने ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी’च्या ठेवीच्या रक्कमेत ५० कोटींची वाढ करुन या निधीची एकूण ठेवीची रक्कम आता ₹ १०० कोटी केली आहे. मुदत ठेव स्वरुपात गुंतवण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून आता ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.या दोन्ही निर्णयाबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय काल शासनाकडून निर्गमीत करण्यात आले आहेत”, असेही शीतल करदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, “सदर ज्येष्ठ पत्रकार सन्माननिधीतील ही रु. ९ हजार ची वाढ देताना ती याबाबतचा शासन निर्णय झाल्यापासून म्हणजेच दि. १४ मार्च २०२४ पासूनच्या फरकासह येत्या दि. ०१ एप्रिल २०२५ पासून देण्यात यावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच शासनाकडे केली आहे. या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा”, असेही आवाहन शीतल करदेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

18 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

18 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

18 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago