क्राईम

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारात युवतीवर (वय २६) अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) याचा पोलिसाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटो समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दत्तात्रय गाडे याच्यासारख्या सराईत गुन्हेगाराकडे पोलिसांचा गणवेश कसा आला, हा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर आता दत्ता गाडे याच्याकडे पोलिसी गणवेश कुठून आला, यासाठी आज दुपारी गुन्हे शाखा त्याची चौकशी केली जाणार आहे.

दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आज दुपारी या फोटोबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस दलातील कोणत्या कॉन्स्टेबलचा हा गणवेश आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. दत्तात्रय गाडे एका राजकीय पक्षातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता आहे. त्याचे राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संबंध होते. त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या चौकशीतून काय समोर येणार, हे बघावे लागेल.

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांच्या गणवेशातील फोटो आढळून आला होता. चौकशी केल्यानंतर याबाबतचा आणखी तपशील समोर आला होता. आपण पोलिस आहोत, अशी बतावणी करुन पोलिस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, असे सांगत दत्ता गाडे अनेक मुलींशी ओळख वाढवायचा.

 

आरोपी गाडेच्या ओळखीचा एक व्यक्ती पिंपरी-चिंचवड परिसरात पोलीस दलात आहे. गाडे याने त्या व्यक्तीचा गणवेश अंगावर परिधान करून फोटो काढल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी दत्ता गाडे याने परिधान केलेला हा पोलिसाचा गणवेश नक्की कोणत्या पोलिस कर्मचाऱ्याचा होता की त्याने तो शिवून घेतला होता, याचा तपास होण्याची गरज आहे. अशाप्रकारे गणवेश घालून एक आरोपी जर गुन्हे करत होता तर पोलिसांच्या ही बाब लक्षात आली नाही का असाही प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे याच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

पोलिसांच्या अंदाजानुसार, दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. युवतीवरील बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर घेऊन त्याने आणखी कोणत्या तरुणींवर अत्याचार केले आहेत का, याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे.

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago