महाराष्ट्र

कला केंद्राच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २५ तरुणींची सुटका, उपसरपंच बर्गे प्रकरणातील नर्तिका अटकेत

माढा: मोडनिंब येथील पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्च रोजी छापा टाकून तब्बल २५ तरुणींची सुटका केली असून एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील नर्तिका देखील या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली असल्याचे समोर आले आहे. गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक केली असून ती सध्या पोलिस कोठडीत आहे. चौकशीत तिने बर्गे यांच्यासोबत संबंध असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

कला केंद्राच्या नावाखाली काळे धंदे

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘स्वरांजली कला केंद्र’ हे नावापुरतेच असून प्रत्यक्षात येथे वेश्याव्यवसायाचे जाळे चालवले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. येथे श्रीमंत ग्राहकांसाठी पार्ट्यांचे आयोजन केले जात असे. नर्तिकांच्या नृत्य कार्यक्रमांच्या आडून ग्राहकांना आकर्षित करून त्यांना अनैतिक कृत्यांकडे ढकलण्याचे रॅकेट चालत होते. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हाय-प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचा प्रकार

पोलिसांच्या छाप्यात केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल फोन आणि रेकॉर्डिंग उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. बाहेरून आणलेल्या तरुणींना येथे कोंडून ठेवून त्यांना ग्राहकांसमोर नृत्य करण्यास व अनैतिक कृत्यांसाठी भाग पाडले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी हाय-प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचेही आयोजन होत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे आधीच राज्यात खळबळ उडाली असताना, त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये सापडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

1 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

4 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

7 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago