महाराष्ट्र

खडकवासला धरण परिसरात सतर्क सुरक्षारक्षकामुळे युवती सुरक्षित घरी

पुणे: खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षांच्या एका युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेल्याची घटना घडली. अंधारात ती एकटी उभी असताना धरण परिसरातील सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून ती सुखरूप घरी पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती गुरुवारी (ता. १२) आपल्या चुलतभावासोबत धरण परिसरात आली होती. त्यावेळी तिच्या मित्राने ‘दोन मिनिटे थांब, मी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो’ असे सांगून तेथून निघून गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने युवती धरणाच्या कडेला झाडाखाली अंधारात एकटीच उभी होती. ही बाब सुरक्षारक्षक वऱ्हाड यांच्या निदर्शनास आली.

त्यांनी तत्काळ तिच्याकडे जाऊन विचारपूस केली. वऱ्हाड यांनी त्या मुलाचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. संबंधित युवतीकडे स्वतःचा मोबाइलही नव्हता.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वऱ्हाड यांनी तिला सुरक्षितपणे घरी पाठवण्यासाठी ऑटोरिक्शाची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, तिने घरातील कौटुंबिक अडचणी असल्याचे सांगत घरी जाण्यास नकार दिला. यानंतर वऱ्हाड यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

काही वेळातच स्थानिक पोलिस कर्मचारी दीपक सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युवतीला सुरक्षितपणे तिच्या नांदेड सिटी परिसरातील घरी पोहोचवले. या संवेदनशील आणि तत्पर कृतीबद्दल वऱ्हाड यांचा रोटरी क्लब ऑफ सिंहगड रस्ता यांच्या वतीने इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

28 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

14 तास ago