महाराष्ट्र

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेताच कार्यकर्त्यांचा ढोलताशांच्या गजरात जल्लोष…

मुंबई: आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात जोरदार आनंद व्यक्त केला. (दि. २ मे) २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली असेही शरद पवार म्हणाले.

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास याने मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे असे ठरवले, या निर्णयाचा देखील मान राखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे असे शरद पवार यांनी जाहीर केले.

मी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश-अपयशात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल शरद पवार यांनी ऋण व्यक्त करतानाच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केरळचे आमदार के. थॉमस, पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आदींसह पक्षाचे आमदार, प्रवक्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

1 मिनिट ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

6 मिनिटे ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

10 मिनिटे ago

NEET 2026 मध्ये बारामतीची श्रावणी देशात अव्वल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ कॉलवरून गौरव

मुंबई: नीट (NEET) २०२६ परीक्षेत बारामतीच्या कुमारी श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण…

13 मिनिटे ago

मतांसाठी ‘लाडकी बहीण’, सत्तेनंतर ‘अपात्र’; सरकारने महिलांचा विश्वासघात केल्याचा काँग्रेसचा आरोप

'लाडकी बहीण' योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवणे, ई-केवायसीमुळे लाभ रोखणे आणि ₹२,१०० चे आश्वासन पूर्ण…

17 मिनिटे ago

शिरुर! पाठीवर वडाचे झाड घेऊन पंढरपूरची पायवारी; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात युवकाचा अनोखा एल्गार

शिरुर (तेजस फडके): एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात, पर्यावरण संवर्धनाचे…

22 मिनिटे ago