शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शेजारील व्यक्तीने अनाधिकाराने प्रवेश करत बांधकामाचे पिलर जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय गुलाब मासळकर या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे रामराव मासळकर यांच्या घराचे काम सुरु असून काही काम होऊन पिलर उभे करण्यात आलेले असताना शेजारील विजय मासळकर यांनी रामराव यांच्या जागेत अनाधिकाराने प्रवेश करुन घराचे काम सुरु असलेल्या इमारतीचे 9 पिलर जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केले.
घडलेल्या प्रकाराबाबत रामराव केरबा मासळकर (वय ५९) सध्या रा. साईनगरी सोसायटी चंदननगर पुणे मूळ रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विजय गुलाब मासळकर रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…