महाराष्ट्र

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचे जगभरातून कौतुक होत असताना, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल व्यक्त केलेला आदर ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

कॅप्टन मच्छार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले. त्यामुळे विमानातील इतरांना हल्लेखोराला रोखता आले आणि विमान सुरक्षितपणे उतरविण्यात यश आले. त्यांच्या या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले.

कॅप्टन स्मित मच्छार यांनी १७४ नागरिकांचे प्राण वाचविले. ही केवळ एका वैमानिकाच्या शौर्याची घटना नसून संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. त्यावेळी कॅप्टन मच्छार यांनी पंतप्रधान मोदी यांना आपला आदर्श आणि प्रेरणास्थान मानत असल्याचे सांगितले.

“जगभरातून ज्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे, तेच कॅप्टन मच्छार भारताच्या पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव करतात, ही बाब विशेष आहे. संकटाच्या क्षणी धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा दाखविणाऱ्या या वैमानिकाने भारताची मान उंचावली आहे,” असे शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्याशी झालेल्या संवादात त्यांच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले होते. गंभीर जखमी असूनही त्यांनी स्वतःच्या जीवापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे मोदी यांनी सांगितले.

“भारताची ओळख प्राण घेणाऱ्या नव्हे, तर प्राण वाचविणाऱ्या संस्कृतीची आहे. कॅप्टन मच्छार यांनी आपल्या कृतीतून हीच भारतीय मूल्ये जगासमोर सिद्ध केली आहेत. त्यांच्या शौर्यामुळे भारतीय वैमानिकांची प्रतिष्ठाही जगभरात अधिक उंचावली आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.

कॅप्टन मच्छार यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या शौर्याची भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असून, देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“कॅप्टन मच्छार यांचे धैर्य, पंतप्रधान मोदी यांनी केलेले कौतुक आणि त्यांच्याबद्दल कॅप्टन मच्छार यांनी व्यक्त केलेला आदर हा भारताच्या नेतृत्वावर आणि मूल्यांवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा देशाला अभिमान आहे,” असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

4 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

23 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

23 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

1 दिवस ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

1 दिवस ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

1 दिवस ago