महाराष्ट्र

भर सभागृहात शिंदेंना तोंडावर गद्दार म्हटले, आदित्य ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

मुंबई: विधीमंडळात गुरुवारी दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसले. केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी 293 च्या चर्चेला उत्तर दिले. यावरून आपल्याला बोलायचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले.

मात्र विधानसभा अध्यक्षांनी तुम्हाला तसे करता येणार नाही असं म्हटल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. हा गदारोळ सुरू असतानाच आदित्य ठाकरे सदनात आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडे पाहात आता ‘गद्दारांचे ऐकायचे का?’ असा प्रश्न विचारला. यानंतर शिंदेंचे आमदार आक्रमक झाले ज्यामुळे सदनाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते.

नेमके काय झाले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 293 च्या प्रस्तावावर बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेला झोंबतील असे मुद्दे मांडत उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले की, मतदाना आधी म्हणायचे मराठी मराठी, आणि मतदान झाले की ‘कोण रे तू’ अशी भूमिका तुमची. कोविड काळात खिचडी घोटाळा आणि डेडबॉडी बॅग चोरणारे सत्ताधारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत असे शिंदे यांनी म्हटले. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया याची चौकशी सुरू आहे. जर त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल असा टोलाही शिंदे यांनी लगावला. त्यांचा रोख हा आदित्य ठाकरेंकडे असावा असा अंदाज बांधला जात आहे. शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना त्यावर बोलायचे होते, मात्र तसे करता येणार नाही असे विधानसभा अध्यक्षांनी नियमाचा हवाला देत सांगितले. यावरून गदारोळ सुरू असताना आदित्य ठाकरे सदनात आले आणि त्यांनी शिंदेंच्या आमदारांना पाहून आता ‘गद्दारांचे ऐकायचे का?’ असा प्रश्न विचारला..

शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांकडे पाहून हातवारे करणे, इशारे करणे हे चुकीचे असून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी गैरवर्तन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देसाई यांनी केली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी आता पुढील कामकाजाकडे वळूया असे म्हणत गोंधळावर पडदा टाकला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago