महाराष्ट्र

भाजपला काँग्रेसच्या नेत्यांची गरज का?

पुणे: छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपचे नेते करतात. तरीदेखील धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते-नेते यांना घेण्याची गरज पडते आहे.

भाजप हा चेटकिणीचा पक्ष आहे,” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी भाजपवर टीका केली. जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला म्हणून कोणी जात नाही, तर स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी जातात, अशी प्रतिक्रिया संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशावर त्यांनी दिली.

पुरंदरचे माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. बैठकीपूर्वी सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली, मग तिथे जिल्हाध्यक्षांचे काय घेऊन बसलात, असा टोलाही त्यांनी लगाविला.

काँग्रेस देशातील सर्वाधिक जुना आहे. या पक्षाने देशाला राज्यघटना दिली. मात्र भाजप मतदारांची चोरी करून सत्तेत बसलेला पक्ष आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत आणि ते त्यांच्या नेत्यांना मोठेही करत नाही; मात्र अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धाक दाखवून ते स्वतः पक्षात घेत आहेत. काँग्रेस हा नेत्यांचा नव्हे तर विचारांचा पक्ष आहे, असेही सपकाळ म्हणाले.

राज्यातील महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसून घाशीराम कोतवाल राज्य चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली. काही मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याच्या प्रकाराची एसआ़टी चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण दडपू नये, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात धमकाविण्याचे प्रकार

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांची भेट घेतली. त्यावर सपकाळ म्हणाले, ”वैचारिक मांडणी करणाऱ्यांना धमकाविणे, त्यांना घाबरविणे हाच प्रकार सध्या सुरू आहे. गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागे महसूलमंत्री असल्याने राज्यात काय सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे. मात्र भाजपचे हे कारस्थान लोकांपर्यंत पोहोचवून वैचारिक क्रांती केली जाईल आणि त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

8 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

8 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

9 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

9 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

9 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

14 तास ago