महाराष्ट्र

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी, असा ठाम दावा व्यक्त केला. आदित्य ठाकरेच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करून केलेल्या वक्तव्यावरून आपली भूमिका मवाळली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला.

मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, “मला याविषयी माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षातून कोणाला उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणणे हे आमच्या सर्वांचे काम आहे. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा करावी लागेल.”

आदित्य ठाकरेवर संजय राऊतांचे मत

आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी द्यावी, असे सांगितले होते. यावर संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितले आहे, त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे.”

चंद्रपूर महापौरपद गमावल्याबाबत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटामुळे महापौरपद गमावले असल्याचे वक्तव्य केले. यावर संजय राऊत यांनी सांगितले की, “तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावले. आम्ही तुमच्या सोबत होतो. दिल्लीमध्ये उच्च पातळीवर बैठक झाली आणि दोन्ही गटांना समज देण्यात आले. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत, त्याचा परिणाम चंद्रपूरमधील राजकारणावर झाला.”

राहुल गांधीबाबत

भिवंडी न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी किंवा संजय राऊत यांनी काही विधानं केली तर सरकारचा अवमान होतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago