महाराष्ट्र

सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल; शिवसेना नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विश्वास

सांगलीसह रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा काल मुक्तागिरी येथे शिवसेनेत प्रवेश

मुंबई: सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल, असा विश्वास शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सांगलीतील पाच माजी नगरसेवकांनी तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. या पक्ष प्रवेश सोहळ्यास आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, चंद्रहार पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. ग्रामीण भागातून मोठं झालेलं नेतृत्व असल्याने ते इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देतात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकेंच्या आदेशाने अयोध्येत कारसेवेसाठी गेलेले सुरेश शेळके यांनीही आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. यातून बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेच पुढे घेऊन जात आहेत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.

आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस प्रदेश सचिव सागर वनखंडे, सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव राज सोनार, माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, माजी नगरसेवक अश्विनी कांबळे, माजी नगरसेवक कल्लाप्पा कांबळे, माजी सभापती अनिता वनखंडे, माजी शिक्षण उपसभापती तानाजी व्हनकडे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, रत्नागिरीमधील उबाठाच्या महिला संपर्क प्रमुख वर्षा पितळे, कोल्हापूर विधानसभा संपर्क प्रमुख प्राची पोतदार, दक्षिण कराड विधानसभा संपर्क प्रमुख रोहीणी लोंढे, मुक्ताईनगरचे उबाठाचे विष्णू राणे, भुसावळमधील उबाठाचे आदित्य राणे या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

9 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago