महाराष्ट्र

भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. सोलापूरमध्ये अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दोन माजी आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर मंगळवेढ्यातील नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे हे सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेते आहेत. शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगळवेढ्याला येत बबनराव आवताडे यांची भेट घेतली. तेव्हापासून आवताडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जयवंत जगताप हे बबनराव आवताडे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आवताडे यांच्या प्रवेशासाठी शहाजीबापू पाटील आणि जयवंत जगताप यांनीही आग्रह केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हेदेखील आवताडे यांच्या प्रवेशासाठी आग्रही आहेत.

बबनराव आवताडे यांनी सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील सहकारी संस्थांवर वर्चस्व राखले आहेत. त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, तर सोलापूरमध्ये सहकार क्षेत्रातील मोठा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला मिळेल. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचा मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

12 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago