महाराष्ट्र

जगदीप धनखड यांच्याविषयीची मोठी माहिती आली समोर

मुंबई: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते.

दरम्यान, राजीनाम्यानंतर ते दीर्घकाळापासून सार्वजनिक जीवनातून दूर आहेत. विरोधी पक्षांच्या खासदारांनी, ‘जगदीप धनखड नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबद्दल कोणतीही माहिती का मिळत नाही, अशीही विचारणा होत आहे. परंतु, धनखड सध्या कुठे आहेत, याचा आता खुलासा झाला आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पूर्वी जिथे वास्तव्यास होते, तिथेच आहेत. म्हणजेच, ते सध्या उपराष्ट्रपती निवासातच आहेत. धनखड यांचे कोणतेही निवेदन समोर आले नसले किंवा ते कुठेही दिसले नसले, तरी ते ‘व्हाईस-प्रेसिडेंट एन्क्लेव्ह’मध्येच राहत आहेत, असे समजते आहे.

राज्यसभा सचिवालयाने ६ ऑगस्ट रोजी, धनखड यांचे वरिष्ठ खासगी सचिव असलेले कौस्तुभ सुधाकर भालेकर यांची माजी उपराष्ट्रपतींचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती केली. धनखड गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चर्च रोडवर नव्याने बांधण्यात आलेल्या व्हाईस-प्रेसिडेंट एन्क्लेव्हमध्ये राहण्यास गेले होते. हे निवासस्थान सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उपराष्ट्रपतींचे निवास आणि कार्यालय यासाठी बांधण्यात आले आहे.

२१ जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून, जगदीप धनखड लवकरच उपराष्ट्रपती निवास सोडून त्यांना मिळणाऱ्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित होतील, अशी चर्चा जोर धरू लागली होती. त्यासाठी त्यांनी स्थलांतराची तयारीही सुरू केली होती. मात्र, अद्याप त्यांनी स्थलांतर केलेले नसून ते उपराष्ट्रपती निवासातच राहत आहेत.उपराष्ट्रपती पद भूषवल्यामुळे, धनखड दिल्लीतील लुटियन्स झोनमधील टाइप-८ सरकारी बंगल्यासाठी पात्र आहेत. हा बंगला अत्यंत प्रशस्त असून तो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांना दिला जातो. साधारणपणे, याचे क्षेत्रफळ आठ हजार ते साडेआठ हजार चौरस फूट इतके आहे.

जगदीप धनखड कुठे आहेत? विरोधकांचा प्रश्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्यासह अनेक नेत्यांनी जगदीप धनखड कुठे आहेत, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचा सध्याचा पत्ता काय आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबद्दल काहीही स्पष्टता नाही. राज्यसभेच्या काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच समजले नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

18 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

18 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

1 दिवस ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

1 दिवस ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

1 दिवस ago