ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
पाबळ (सुनिल जिते).: शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे जय श्रीराम ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन, ज्यामुळे उपस्थित शेकडो भाविक मंत्रमुग्ध झाले.
चैत्र शुद्ध नवमीच्या शुभमुहूर्तावर दुपारी बारा वाजता मंदिरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. ‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषात आणि पुष्पवृष्टीत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महिलांनी पारंपरिक पाळणा गाऊन प्रभूंच्या जन्माचा आनंद साजरा केला.
उत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात ह.भ.प. सूरज महाराज अंतवडीकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. रामायणातील आदर्श, धर्माचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती यावर त्यांनी प्रभावी विवेचन करत भाविकांना आध्यात्मिक संदेश दिला. त्यांच्या सुमधुर भजनांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.
जन्मोत्सवानंतर सायंकाळी गावातून श्रीरामांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
उत्सवाच्या सांगतेनंतर जय श्रीराम ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त, उत्सव समिती आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ट्रस्टकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…