महाराष्ट्र

मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार

नाशिकमधील ८ हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती

नाशिक: नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठीही समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी हे बदल करण्यास अनुकूलता दर्शवली.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील विविध उद्योजक, संघटना आणि मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी नाशिक शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी मुंबई, पुणे ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही समान नियम लागू करावे अशी मागणी क्रेडाईच्या वतीने करण्यात आली. याबाबत सामंत यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधून क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. नाशिक मधील विकासकांनी मांडलेली अडचण समजून घेत त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यावर नाशिकमध्येही समान नियम लागू करू असे सांगितले.

मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणी नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार ९ मीटर रुंदीच्या रस्त्यांना लागून असलेल्या इमारतींना १.८ ते २ आणि त्यावर अधिक ०.५ इन्सेटिव्ह एफएसआय असा २.५ पर्यंत एफएसआय मिळत असल्याने रस्त्यालगत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणे विकासकाना व्यवहार्य ठरते मात्र नाशिकमध्ये तो फक्त १.४ पर्यंतच मिळत असून अतिरिक्त ०.३ % एफएसआय विकत घ्यावा लागतो. त्यामुळे नऊ मीटर रस्त्याला लागून असलेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचे क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणी इमारतीची उंची मोजताना पोडियम पार्किंग सोडून मोजली जाते मात्र नाशिकमध्ये ती पोडियम पार्किंग सहित मोजली जाते त्यामुळे विकासकाना त्याचे नुकसान होत असल्याचे क्रीडाईच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावर या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी निवडणुकीनंतर मुंबई, पुणे, ठाण्याप्रमाणे नाशिक शहरातही समान नियम लागू केले जातील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसे निर्देश नगरविकास विभागाला देण्यात येतील असेही शिंदे यांनी यावेळी फोनवरून बोलताना सांगितले.

नाशिक शहरात ९ मीटर रस्त्याला लागून असलेल्या इमारतींची संख्या ८ ते १० हजार एवढी आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही समान नियम लागू झाल्यास त्याचा मोठा फायदा या इमारतींच्या पुनर्विकासाला होईल. आपले म्हणणे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून तत्काळ याबाबत ठोस कारवाई केल्याबद्दल नाशिक क्रीडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

16 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

16 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

21 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

21 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

21 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

21 तास ago