आरोग्य

हिमोग्लोबीन कमी असल्याने नेहमीच थकल्यासारखं वाटत हा एक पदार्थ खा अशक्तपणा जाऊन तरतरी येईल

ॲनिमियाचा त्रास असेल किंवा शरीरातील लोह कमी झाले असेल तर अशा व्यक्तींना नेहमीच गळून गेल्यासारखे होते. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. अंगातील ताकद कमी झाल्याने नेहमीच खूप अशक्तपणा जाणवतो.

भारतात तर ॲनिमियाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आहेत. शिवाय त्यातही महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. शरीरातले हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काही पदार्थ नक्कीच आपल्याला खूप मदत करू शकतात.

ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पद्धतीने खायला हवे, याविषयीची माहिती आहार तज्ज्ञांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.

हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी मदत करणारे पदार्थ

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी नेमका काय उपाय केला पाहिजे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडीओ आहार तज्ज्ञांनी fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की काळ्या मनुका हा हिमोग्लोबिन वाढविण्याचा आणि ॲनिमियाचा त्रास कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी ८ ते १० मनुका पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास अगदी महिनाभरातच तुमच्या शरीरातली लोहाची पातळी खूप चांगल्या प्रमाणात वाढलेली दिसेल. यासोबतच काळ्या मनुका खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ते नेमके कोणते ते पाहुया..

काळ्या मनुका खाण्याचे फायदे

1) पाण्यात भिजवलेल्या काळ्या मनुका नियमितपणे खाल्ल्यामुळे पचनशक्ती अधिक चांगली होण्यास मदत होते.

2) काळ्या मनुकांमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होते.

3) काळ्या मनुकांमध्ये असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

4) काळ्या मनुका हा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चा उत्तम स्त्रोत मानला जातो.

5) ज्यांना नेहमीच ॲसिडीटीचा त्रास होतो त्यांनी काळ्या मनुका नियमितपणे खायला हव्या. कारण त्या पित्तशामक असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago