महाराष्ट्र

मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा; चंद्रकांत पाटील

द्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत आढावा बैठक संपन्न

नागपूर: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे काल (दि. 7) रोजी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय उपायुक्त गजेंद्र बावणे, रिद्धपूर येथील महंत कारंजेकर बाबा, महंत वाईनदेशकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, सहसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव, डॉ. उमेश काकडे, संतोष चव्हाण, प्रशासन अधिकारी डॉ. प्रभू दवणे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने समिती गठित केली. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला आहे.

मराठी भाषाविद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करण्याबाबत नियम व अटी तपासून उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा आणि ही जागा अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे, असे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

महानुभाव गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समितीरिद्धपूर (जि. अमरावती) यांच्या जागेत (कॅम्पस) मध्ये जून २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याबाबत ही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

31 मिनिटे ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

35 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

5 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

19 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

20 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

20 तास ago