महाराष्ट्र

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला गती

वास्तू विशारद संस्थाकडून वास्तू आराखड्याचे सादरीकरण

मुंबई: गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या वास्तू आराखड्यासाठी विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यांतर्गत आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विविध वास्तू विशारद संस्थांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला आता गती येणार आहे.

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संगीत महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, ज. जी. वास्तूशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद गोसावी, मुख्य वास्तू शास्त्रज्ञ आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. वास्तू आराखडा (डिझाइन) विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वास्तू विशारद संस्थांचाही प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेंतर्गत वास्तू आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वास्तू विशारद संस्थांचा पुरस्कार देवून सन्मान देखील केला जाणार आहे. लवकरच या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन केले जाणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

5 तास ago

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

9 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

11 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago