पुणे: पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंजली शंकर साळवे असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक लागताच अंजलीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती खाली पडली. दुर्दैवाने ती थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.
दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तरुणी दुचाकीवरून जात असताना निमुळत्या रस्त्यावरून जाणाऱ्या सिमेंट मिक्सरचा तिला धक्का बसल्याचे दिसते. त्यानंतर तिचे नियंत्रण सुटून ती मिक्सरखाली गेल्याचे स्पष्ट दिसते. गाडीचा वेग अधिक असल्याने काही अंतरापर्यंत ती चिरडली गेल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.
या प्रकरणी बावधन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालक राजपाल कसबे याला अटक केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘सूर्या कन्स्ट्रक्शन’चे मालक गणेश कलशेट्टी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…