महाराष्ट्र

महामंडळ म्हणजे पत्रकारांसाठी ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम वैधानिक व्यवस्था उभी करा; एस. एम. देशमुख

मुंबई: पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्याऐवजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सक्षम वैधानिक व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेसह काही पत्रकार संघटना आणि ज्येष्ठ पत्रकारांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे तो विषय तेव्हाच थांबला होता. मात्र अलीकडेच विधिमंडळात हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला असून पत्रकारांसाठी महामंडळ लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात आधीच सुमारे 70 आर्थिक विकास महामंडळे अस्तित्वात आहेत. ही महामंडळे ‘पांढरे हत्ती’ ठरली असून त्यांच्या माध्यमातून कोणत्याही समाजघटकाचा अपेक्षित विकास झालेला नाही. निधीअभावी आणि सरकारी उदासीनतेमुळे अनेक महामंडळे मृत्यूशय्येवर असल्याने ही व्यवस्था कुचकामी ठरली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांसाठी नवीन महामंडळ स्थापन करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. काही पत्रकारांची सोय करण्यासाठीच हा आग्रह धरला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

पत्रकारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देशपातळीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही वैधानिक संस्था कार्यरत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सक्षम वैधानिक व्यवस्था उभारावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.सरकारची इच्छाशक्ती असेल तर पत्रकार पेन्शन, आरोग्य योजना, गृहनिर्माण, पत्रकार संरक्षण कायदा, अधिस्वीकृतीचे प्रश्न आणि वेतन आयोगाची अंमलबजावणी हे सर्व विषय एका बैठकीत मार्गी लागू शकतात. मात्र सरकारला पत्रकारांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

देशमुख यांनी उदाहरण देत सांगितले की, पत्रकार पेन्शन योजनेसाठी असलेल्या समितीची बैठक दीड वर्षांपासून झालेली नाही. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन आठ वर्षे झाली तरी त्याचे अधिसूचना (नोटिफिकेशन) निघालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केवळ महामंडळ स्थापन करून परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. उलट काही पत्रकारांची सोय करण्यासाठी सरकार पत्रकारांना ‘महामंडळाचे चॉकलेट’ देत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.या विषयावर निर्णय घेण्यापूर्वी प्रमुख दैनिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणीही देशमुख यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

6 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago