महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा समजून काम करावे

ठाणे: एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा -मोहरा बदलून ” फाईव्ह स्टार ” परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतल्या असून ” खड्डेमुक्त बसस्थानक ” हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताण-तणाव मुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारांमध्ये वातानुकूलित, स्वच्छ व टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी एस टी प्रशासनाला दिले. खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाबाबत समाधान व्यक्त करून हे ” रोल मॉडेल ” संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पामध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याच्या संकल्प असून माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा.मंत्री परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

14 तास ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

19 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

21 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago