आरोग्य

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन

वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाणं अनेकांना आवडतं. बरेच लोक रोज जेवण झाल्यावर किंवा असेही न विसरता मिठाई खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मिठाईचा एक पीस तुमचं वजन वाढवू शकतं. साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.

एक चमचा साखर(५ ग्रॅम)मध्ये जवळपास २० कॅलरीज असतात. ऐकायला जरी हे कमी वाटत असलं, तरी तुम्ही दिवसभर चहा, कॉफी, मिठाई आणि इतर फूड्सच्या माध्यमातूनही शुगर मिळवत असता. त्यामुळे कॅलरी वाढून तुमचं वजन वाढतं.

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं वजन

गुलाब जामून (५० ग्रॅम) – जवळपास १५० ते २०० कॅलरीज.

रसगुल्ला (५० ग्रॅम) – १२५ ते १५० कॅलरीज.

बर्फी(४० ग्रॅम) – १५० ते १७० कॅलरीज.

लाडू (४० ग्रॅम) – १८० ते २०० कॅलरीज.

जर तुम्ही रोज मिठाईचं सेवन करत असाल आणि त्यासोबतच शुगर असलेल्या इतर पदार्थही खात असाल, तर तुमचं वजन वेगानं वाढू शकतं. दर ७, ७०० एक्स्ट्रा कॅलरीजमुळे तुमच्या वजनात १ किलो वाढ होऊ शकते.

साखर आणि मिठाई कमी खाण्यासाठी टिप्स

मिठाई कमी खा. मिठाई रोज खाण्याऐवजी एखादा इव्हेंट किंवा उत्सव असल्यावरच खा.

साखरेऐवजी मध, गूळाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर करा. याने कॅलरी वाढणार नाहीत.

जर तुम्ही मिठाई खाल्ली असेल तर कॅलरी बर्न करण्यासाठी एक्सरसाईज करा.

आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताजी फळं यांचा समावेश करा.

साखरेनं आरोग्याला धोका

जास्त साखर खाल्ल्यानं केवळ वजन वाढतं असं नाही तर डायबिटीस, हार्ट डिजीज आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

8 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago