शिरूर तालुका

माता पालक मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मलठण येथे मोठ्या उत्साहात साजरा

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व शाळा व्यवस्थापन समिती मलठन यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीचे पूजनाने करण्यात आली.

यावेळी माता पालक यांना पालक म्हणून जबाबदारी काय असते,मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये शिकणारे मुलेही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे,म्हणून त्यांना कमी समजू नका. पालक म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकडे लक्ष द्या, शाळेत तुम्ही आले पाहिजेत,यासाठी हा मेळावा घेण्यात आला.असे मार्गदर्शन डाँ.स्मिता बोरा मॅडम यांनी केले.तसेच शिरूर संवादिनी ग्रुप ने इयत्ता १ली ते ७ वी विद्यार्थ्यांना ओळख स्पर्शाची हा उपक्रम घेतला,यातून मुलांना चांगला स्पर्श,वाईट स्पर्श समजले.

ग्रामीण भागातील महिला स्वतः कधी डॉक्टरकडे जाऊन शरीराची तपासणी करत नाही म्हणून या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यासाठी उपकेंद्र मलठन यांचे सहकार्य मिळाले.हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने साजरा झाला.सर्व महिलांना वान व अल्पउपहार देण्यात आला.प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,सर्व शिक्षक वृंद, इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago