महाराष्ट्र

पुण्यात थकित ई-चलनधारकांवर कडक कारवाई; 30 दिवसांत दंड न भरल्यास लायसन्स रद्द होणार!

पुणे: पुणे पोलीस यांनी वाहनचालकांसाठी मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. वाहनांवरील थकित दंड न भरणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, 30 दिवसांच्या आत दंड न भरल्यास वाहन मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे.

एसएमएसद्वारे मिळणार नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लायसन्स रद्द करण्यापूर्वी वाहन मालकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे नोटीस पाठवली जाणार आहे. या नोटीसा 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चदरम्यान पाठवण्यात येणार आहेत.ही नोटीस MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून पाठवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष मोहीम; रस्त्यावर तैनात पोलिस

या कारवाईसाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून थेट रस्त्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. थकबाकीदार वाहनधारकांवर ऑन-द-स्पॉट कारवाई होण्याची शक्यता आहे.

2019 पासून सुरू ई-चलन प्रणाली

मार्च 2019 पासून पुण्यात ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, अनेक वाहनधारकांनी ई-चलन मिळूनही दंड भरलेला नाही. त्यामुळे आता कडक पावले उचलली जात आहेत.

30 दिवसांची मुदत; अन्यथा न्यायालयीन कारवाई

नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक आहे. मुदतीत दंड न भरल्यास:

ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल

संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल केला जाईल

अशी माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

दंड कसा भराल?

वाहनधारक पुढील माध्यमांतून दंड भरू शकतात:

अधिकृत वेबसाइट: https://mahatraf-ficechallan.gov.in⁠�

Pune Traffic Police App (PTP App)

वाहनचालकांसाठी महत्त्वाचा इशारा

आपल्या वाहनावर थकित ई-चलन आहे का हे तात्काळ तपासा आणि 30 दिवसांच्या आत दंड भरून लायसन्स रद्द होण्यापासून स्वतःचा बचाव करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

8 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

13 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago