मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी आपापली मते मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असून, शिवसेनाही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल, असा विश्वास व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही सर्वजण आपल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल.”राज्यसभा उमेदवारी अर्जासाठी ५ मार्चपर्यंत मुदत असल्याने मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मालेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया
मालेगाव प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये. मात्र सध्या रमजानचा महिना सुरू असून रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद घातला जात असून तो पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे, असा आरोप त्यांनी केला.
“समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांनाही सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…