पुणे: पुणे सोलापूर हायवेवर वर बनावट फायनान्स कंपनीचे नाव सांगत वाहनचालकांना अडवून दमदाटी, मारहाण आणि लूटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटस टोलनाक्याजवळ थरारक प्रकार
२२ फेब्रुवारी रोजी Patas टोलनाक्यापासून ते यवत गावादरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कारसमोर गाडी आडवी लावून प्रवाशांना अडवले. “आम्ही फायनान्स कंपनीचे आहोत, तुमच्या गाडीचे हप्ते थकले आहेत,” असे सांगत त्यांनी प्रवाशांना धमकावले आणि मारहाण करत लूटमार केली.
या प्रकरणी अक्षय भाऊसाहेब सानप (वय ३०, रा. फातिमा नगर, पुणे) यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
‘फायनान्स’च्या नावाखाली खंडणी?
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना हेरून, त्यांना अडवून धमकावत पैसे उकळण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या टोळीला काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अप्रत्यक्ष सहकार्य आहे का? असा संशयही वाहनचालकांकडून व्यक्त केला जात आहे.
वाहनचालकांनी संबंधित टोळीविरुद्ध खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
दिवसाढवळ्या महामार्गावर असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पुणे रूरल पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, तसेच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी विशेष मोहीम राबवून टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे.महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, तातडीने कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…