नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन
नांदेड: अजितदादा पवार यांचे नांदेड जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. विधानसभा निवडणुकीनंतरही ते सहा ते सात वेळा जिल्ह्यात कामानिमित्त आले होते. नांदेडच्या जनतेचेही अजितदादांवर विशेष प्रेम असल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यांचा दौरा केला. नांदेड येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी पदवीधर मतदारांना आवाहन केले.
अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन
“आम्ही आज केवळ एका निवडणुकीसाठी नव्हे, तर नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या भविष्यासाठी एकत्र आलो आहोत. पदवीधरांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अजितदादांनी घालून दिलेला लोकसेवेचा आदर्श पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अभ्यासू आणि अजितदादांचे विश्वासू सहकारी सतीश चव्हाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
अजितदादांशिवाय होणाऱ्या या निवडणुकीत त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगत त्यांनी सतीश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न विधानमंडळात आक्रमकपणे मांडणारे, अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून सतीश चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना चौथ्यांदा निवडून देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘महायुतीमध्ये कोणताही वाद नाही’
सतीश चव्हाण यांची ओळख युवकांचा विश्वास आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारा नेता अशी आहे. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी मराठवाड्यातील विविध प्रश्न विधानमंडळात मांडले आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण हे मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व असून ते एक ‘चालते-बोलते ब्रँड’ आहेत, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अजितदादांनी विकासाची जी दिशा निश्चित केली, त्याच दिशेने नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत यशाची परंपरा कायम राखाल, याबद्दल मला कोणतीही शंका नाही, असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
‘महायुतीमध्ये कोणताही वाद नाही’
“सफर में मुश्किल आयी तो हिम्मत और बढ़ती है, कोई रास्ता रोके तो जरूरत और बढ़ती है,” या शायरीतून सुनेत्रा पवार यांनी आपला राजकीय निर्धार स्पष्ट केला. महायुतीमध्ये कोणताही वाद नसून सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. विरोधकांकडून नको त्या अफवा पसरवल्या जात असल्या, तरी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जाहीर सभेला भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार संजय बनसोडे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…