महाराष्ट्र

घरकुलसाठी आता मिळणार ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान, एकूण अनुदान २.०९ लाख रुपयांवर

संभाजीनगर: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.

आता कोणकोणते लाभ मिळणार

PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000

मनरेगामधून 90 दिवसांची मजुरी – ₹27,000

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी – ₹12,000

नवीन वाढीव अनुदान (राज्य शासनाकडून) – ₹50,000

एकूण मिळणारे अनुदान – ₹2,09,000

हा निर्णय का घेण्यात आला

सध्या घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य महाग झाले आहे, वाळूची टंचाई जाणवत आहे, आणि अनुदान अपुरे पडत होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली होती. आता सरकारने हे लक्षात घेऊन ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर केले आहे.

कोण लाभ घेऊ शकतो

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी

राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थी

अपूर्ण घरकुल बांधणारे लाभार्थी

नवीन पात्र अर्जदा

घरकुलांवर हरित व स्वच्छ वीजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढीव अनुदानातील ₹15,000 हे सौर यंत्रणा उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.

वाळूचा प्रश्न कधी सुटणार

घरकुलासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण अद्याप सुधारित धोरण स्पष्ट नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव रखडलेले आहेत. शासनाने कारवाईत जप्त केलेली व लिलावातील वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचे नियोजन केले आहे.

घाई करा, अंतिम मुदत जवळ आली आहे

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत १० एप्रिल २०२५ पर्यंत १.६० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तुमचेही घर यामध्ये असावे, यासाठी त्वरित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधा.

अर्ज व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील ग्रामसेवक, सरपंच किंवा पंचायत समिती कार्यालयात भेट द्या.

एक घर, एक स्वप्न – आता सरकारच्या मदतीने पूर्ण होईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago