महाराष्ट्र

भोंदू मनोहर भोसले प्रकरण! माया झोळसह तिघे न्यायालयीन कोठडीत

बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ यांच्यासह राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे या तिघांचीही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, दत्त कला शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.

दत्त कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि त्यांची पत्नी तथा संस्थेच्या सचिव माया झोळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया झोळ यांना पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी अटक केली होती, तर रामदास झोळ सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय विशेष पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासात मनोहर भोसले आणि दत्त कला शिक्षण संस्थेचे आर्थिक संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. भोसलेकडून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट दत्त कला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आल्याचा संशय असून, संस्थेच्या कामकाजातही तपासादरम्यान काही अनियमितता आढळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून संस्थेतील राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे यांना अटक करण्यात आली होती. माढा न्यायालयाने तिघांना सुरुवातीला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी तिघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने माया झोळ, राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, दत्त कला शिक्षण संस्थेच्या कारभाराची धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही यंत्रणांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

भोंदू मनोहर भोसले हा अनिष्ट प्रथा, महिलांवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत सध्या तुरुंगात आहे. त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि संस्थेच्या कारभाराबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

3 तास ago

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

8 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

10 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago