ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मंगल यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, भविष्यातही त्याच उत्साहात सुरू राहील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्यभरातून तसेच परराज्यातूनही हजारो-लाखो भाविक मलंगनाथांच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल झाले आहेत. नाथांच्या समाधीचे दर्शन घेताना भाविक भावविवश होत असून, संपूर्ण परिसरात दिवसभर “नाथांचा जयघोष” घुमत आहे. यात्रेनिमित्त परिसर पूर्णतः भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून, भाविकांसाठी फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे वयोवृद्ध, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांना सहजपणे मलंगनाथांचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी दर्शनापासून वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी सुरू केलेली ही सेवा आजही भक्त आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अखंडपणे सुरू असून, यात्रेचा अनुभव अधिक सुखकर व सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, त्यावर लवकरच न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…