महाराष्ट्र

मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

मुंबई: भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा हा निर्णय सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या सर्वसामान्य गरिब घरातील मुलांवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द करून निधी पूर्वीप्रमाणेच द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार अजब गजब निर्णय घेणारे सरकार आहे. शालेय मुलांच्या मध्यान्न भोजन योजनेतील अंडी, दूध व फळांसाठी सरकारक़डे पैसे नसतील तर सरकारची आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली आहे किंवा सर्वसामान्य गरीब घरांतील मुलांना पौष्टीक आहार मिळू नये असा त्याचा अर्थ आहे.

गरिबांना महिन्याला ५ किलो मोफत धान्य व १५०० रुपये दिले म्हणजे हा घटक गप्प बसेल व सरकारला प्रश्न विचारणार नाही यासाठी हे षडयंत्र असावे. परंतु सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा एक अंडे दिले जाते, त्यासाठी किती निधी लागणार आहे? तेवढेही पैसे सरकार नाहीत असे नाही. स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते पण गरिबांना काही द्यायचे असेल तर निधी नसतो कसा? असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

8 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago