महाराष्ट्र

नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट मास्टरमाईंड शोधून दंगेखोरांवर कारवाई करावी

स्वा. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का

मुंबई: नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा मोठा आरोप केला. तसेच या घटनेमागील मास्टरमाईंड शोधून काढून दंगेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.

सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले कि, औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांची मजल किती वाढलीय हे कालच्या नागपुरातील घटनेने समोर आलीय. या घटनेच्या बाबतीत जी माहिती समोर आलीय ती सभागृहाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शेकडो दुचाकी फोडल्या गेल्या, स्थानिकांच्या वाहनांना टार्गेट केले गेले. दुकानांत तोडफोड करण्यात आली. महाल परिसरातील जुन्या महाविद्यालयाच्या मागील भागात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली. सायंकाळी ज्यावेळी दोन गटांत तणाव झाला तेव्हा सर्वात आधी जमावाने पोलिसांना टार्गेट केले. चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाज कंटकांची धरपकड सुरू केल्यानंतर लोकांनी दगड फेकले. त्यात काही पोलीस गंभीर जखमी झाले. घराजवळ न सापडणारे मोठेमोठे दगड, स्टाईलचे टोकदार तुकडे, लाकडी दांडे दिसून आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवरही दंगलखोरांनी दगड व चाकू फेकून मारले तर काहींनी थेट तलवारी फेकून मारल्या. यात हे जवानही जखमी झाले. समाजकंटकांच्या या हल्ल्यात १५ हून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी जखमी झालेत. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात त्यांना गंभीर जखम झाली आहे.

दरेकर पुढे म्हणाले कि, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. नागपुरात घडलेली ही घटना पूर्वनियोजित कट होता. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविण्यात आल्या. त्या कुणी पसरविल्या याचा शोध पोलिसांनी घ्यावा. बाहेरून लोकं आणून कट रचून घडविलेला हा प्रकार आहे. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण करायची, डोकी भडकावायची, कायदा सुव्यवस्था खराब करण्याचा काहींचा डाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का? या घटनेची चौकशी होऊन त्यामागील मास्टरमाईंड कोण हे शोधून काढले पाहिजे आणि दंगेखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचे दरेकर म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

6 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago