नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली.
सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभागृहात एकत्रितपणे निषेध नोंदवला. सीमावर्ती भागातील घुसखोरीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यास तसेच अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातील अटींबाबत माहिती देण्यास सरकार तयार नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण तापलं. “लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत खासदारांनी सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. घोषणाबाजीमुळे काही काळासाठी कामकाज ठप्प झालं.
दरम्यान, सरकारकडून चर्चेला तयार असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात संसदेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…