महाराष्ट्र

महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या जागा एकत्रित, एकदिलाने लढवेल…

मुंबई: मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्रित व एकदिलाने लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

आज मराठवाड्याचा व नागपूरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या अमरावतीचा अर्ज दाखल करणार आहे. या बैठकीमध्ये इतर पक्षांनी जे अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेस आमदार वजाद मिर्झा, माजी आमदार व कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago