महाराष्ट्र

जनता जागी आहे….राजेंहो सावधान!

मुंबई: सध्या अनिक्षा अनिल जयसिंघानी हे नाव सर्वत्र चर्चेत आहे. अमृता देवेंद्र फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्या प्रकरणी तिला अटक झालीय. तिचे वडील अनिल जयसिंघानी बुकी आहेत. विधानसभेत फडणवीस त्यांना ओळखत नाहीत असे दाखवत होते! यात विरोधकांना ते टार्गेट करताना दिसले. आ जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीला व कुटुंबाला धोका असल्याचा आणि मनपा अधिकारी महेश आहेरचा विषय विधानसभेत काढला होता. संबधित ऑडियो विडियो वायरल करुन रान उठवले.

नंतर दुसर्‍या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत शांत निवांतपणे अनिक्षा जयसिंघानी चा विषय विधानसभेत मांडून आपल्या बायकोला व पर्यायाने त्यांना फसवण्याचा ट्रॅप लावल्याचे सविस्तर सांगितले. नेहमीची आक्रमक व अभ्यासपूर्ण तडफ यात दिसली नाही. तर फडणवीस शांतपणे विषय सांगताना दिसले. यातही या महिलेशी तिच्या वडिलांशी आपली ओळख नाही असे ते दाखवत होते. यामागे कोण आहेत ते माहित आहे पण नावं सांगणार नाही असंही ते म्हणाले. पण प्रत्यक्षात भाजपा-फडणवीस आणि अनिल जयसिंघानी हे कनेक्शन जुनं आहे असंही समोर येत.

कायद्यान वागा चळवळीचे राज असनोडकर यानी एका लेखात या भावबंधाची कुंडली मांडलीय (त्यात 2014 मध्ये सत्तेवर येताच अनिल जयसिंघानीला ‘न्याय’ देणारे फडणवीस होते आणि माध्यमात पोलिसी दप्तरात त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. याबद्दलची डिटेल्ड स्टोरी दिली. नंतर लगेच उध्दव ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांचे फोटो वायरल केले गेले आणि अनेक माहिती पसरवून मविआ विरोधकांना दाबण्याचे काम भाजपकडून सुरु झाले.

तर शिवसेनेकडून हा अनिल जयसिंघानी खा श्रीकांत शिंदे यांचा शेजारी असून त्याला शिवसेनेत कुणी आणलं हे मूळ शोधण्यासाठी आवाज उठला. एकूण विषय गंभीर म्हणून देवेंद्र खंबीर असं बोललं जात. असंच इथे दिसू लागलंय. मूळात ही अनिक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या घरात सहज येजा कशी करु शकत होती? तिचे कपडे दागिने वापरणे तिच्याशी जवळचे संबंध ठेवताना एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून कोणतीही चौकशी तपास न होणे,हा प्राथमिक मुद्दा. अमृता फडणवीस इतक्या साध्या भोळ्या आहेत की ही अनिक्षा व तिचा बाप त्यांनाफसवण्याचा धाडस करु शकेल? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

सध्या राजकारणात इतकी घाण घुसलीय की कुणाला शिकार करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून कुणालाही प्यादी बनवली जाऊ लागलय. इथे रोजच जगणं महाग झालयं, गॅस महाग, अन्नधान्य महाग, नोकऱ्या नाहीत, शेतकरी हवालदिल, कामगार, पत्रकार त्रस्त, आधिवेशन काळात अनेकदा सभागृहात मंत्री उत्तर देण्यासाठी उपस्थित असलेले दिसत नाहीत! आमदारही बसून बोलत,मजेत वावरताना दिसतात. एसटी ची अवस्था वाईट! तिथे प्रवासाला पन्नास टक्के सवलत महिलाना सरकारने दिली.

ओके! पण महिला सुरक्षेचे काय? महिलांसाठी स्वच्छतागृहाची कमतरता आहे, त्याचं काय? गॅस चे दर कसे झपाझप दोन वर्षांत वाढले,ते अर्धे केले तर जगणं जरा सुकर होईल असं बोललो तर इथेही राजकारण सुरू होतं! जनतेने कुणाकडे आशेने पहावं? कोण आपले वाली? असा प्रश्न निर्माण झाल्यास नवल नाही. तत्परतेने कारवाई अनिक्षा जयसिघानीवर होते मग शिवराळ मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर का होत नाही. खासदार महिलेला अपमानित करण्याचा अधिकार त्याना मिळाले आहेत. का मंत्री संजय राठोड मंत्रीमंडळात आहेत.

ज्या विषयावर भाजपा मविआ सरकारवर तुटून पडलेली होती. ते विषय जमिनदोस्त झाले कसे? गृहमत्री देवेंद्र फडणवीस जी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण राजधर्म पालन करत नाहीत. महाराष्ट्राची संस्कृती अशी कधी नव्हतीच! पण सध्या महिलांना लक्ष करुन विरोधक संपवण्याचे काम सुरू आहे हे प्रचंड घातक आहे. विरोधक मविआ ही सत्तेत असताना आस्तेकदम भूमिकेत राहिले, तिघांनी समजून वेळेत कठोर निर्णय घेतले असते तर चित्र वेगळं दिसले असते. असो गुन्हेगार स्त्री असो की पुरूष शिक्षा व्हायला हवी, पण यामागचे मास्टरमाईंड ही समोर यावेत. जनता जागी आहे एकदिवस तीच बोलू लागेल, तेव्हा भल्या भल्यांना पळता भुई थोडी होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

10 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago