मुंबई: मुंबईतील सात रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शनिवारी (१२ जुलै २०२५) घडली.
मिळालेल्या महितीनुसार, पीडित मुलगी प्रसाद घेण्यासाठी इमारतीतून बाहेर पडली असता आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. पीडिताने लिफ्टमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला थांबवले आणि तिचा हात धरला. त्यानंतर तिला जिन्यावरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओढत नेले. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडिताच्या आईने ताबडतोब आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, कलम ७८ आणि पोस्को कायद्यांतर्गत गु्न्हा दाखल केला.
आरोपी ताडदेव येथे सशस्त्र पोलिस दलात कार्यरत आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…