महाराष्ट्र

शिक्षिकेचा पाठलाग करुन तिला मारहाण करत विनयभंग करणार्‍या शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल

पुणे: शाळेतील नोकरी सोडली असतानाही पाठलाग करुन लज्जास्पद वर्तन करुन महिलेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या शाळेच्या संस्थाचालकावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.त्याचवेळी या शिक्षिकेसह इतरांनी रात्री उशिरा शाळेत येऊन मारहाण करुन शाळेच्या खिडकीची काच फोडल्याची या संस्थाचालकाने तक्रार दिली आहे.

याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चैतन्य गुलाब लांडगे (वय ३६), रा. लोणी काळभोर आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य लांडगे यांची मुक्ताबाई गुलाब लांडगे एज्युकेशन सोसायटी या नावाने शिक्षण संस्था आहे. संस्थेची मांजरीतील मोरे वस्तीत केंब्रीज इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या नावाने शाळा आहे. ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शाळेतील शिक्षिकेने काम सोडले आहे. त्याचा राग मनात धरुन फिर्यादी महिला घरी जात असताना त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन चैतन्य लांडगे याने अश्लिल बोलून आपल्याकडे ओढले. त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. हाताने गालावर व डोळ्याजवळ मारहाण करुन जखमी केले. काही मुलांना बालावून तुम्हाला जीवे मारतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी चैतन्या लांडगे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत चैतन्य लांडगे यानेही हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चार महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केंब्रीज इंटरनॅशनल स्कुल येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. लांडगे याच्या तक्रारीनुसार त्यांच्या शाळेत काम करणार्‍या शिक्षिका या पालकांना भेटून शाळेतून नाव कमी करण्यास सांगतात. तसेच शाळेत मद्रासचे शिक्षण दिले जाते, असे अपप्रचार करत आहे. म्हणून शाळेच्या महिला प्राचार्य या पालकांच्या घरी जाऊन गैरसमज दूर केला.

या घटनेबाबत या शिक्षिका रात्री ८ वाजता शाळेसमोर येऊन शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. लांडगे याने या शिक्षिकांच्या पतीला फोन करुन त्यांच्या पत्नीला समजावून सांगण्यास सांगितले. त्यानंतर या महिला निघून गेल्या. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता या शिक्षिका पतीसह परत शाळेत आल्या . त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली. त्यातील महिला व तिच्याबरोबरच्या एकाने दगड मारुन शाळेच्या खिडकीची काच फोडली. एका महिलेने आपल्या थोबाडीत मारली, असे लांडगे याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहू नका! विरोधकांना एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून घणाघात

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…

8 तास ago

दुष्काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना…

8 तास ago

संघर्षातून सत्तेच्या शिखरापर्यंत! जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे

रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…

8 तास ago

डिंग्रजवाडीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन चोरीला; शिक्रापूर पोलिसांची हरियाणापर्यंत धडक!

एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…

12 तास ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

1 दिवस ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

1 दिवस ago