महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ठराव मंजुर

बुध्दगया मंदिर कायदा बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

नवीदिल्ली: बुध्दगया मंदिर कायदा 1949 बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौध्दांच्या ताब्यात द्यावे असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात मिळविण्याचा ना.रामदास आठवले यांनी निर्धार केला असुन त्यासाठी दि.28 मार्च पासुन 3 दिवस ना.रामदास आठवले बुध्दगयेत ठाण मांडणार आहेत.बुध्दगया मंदिर कायदा रद्द करण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करणार असल्याबद्दल ना.आठवले यांच्या पाठिशी संपूर्ण देशभरातील रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगत त्यांच्या बुध्दगया दौऱ्याला यश लाभो अशा शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत ना.रामदास आठवले यांना देण्यात आल्या.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत नवी दिल्ली येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशभरात येत्या वर्षभरात रिपब्लिकन पक्षाचे एक कोटी सदस्य जोडावेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या तालुका; जिल्हा ;राज्य सर्व कार्यकारणी मध्ये दलित आदिवासी सोबत,ओबीसी,अल्पसंख्याक आणि सवर्णं जातसमुहांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करावा. रिपब्लिकन पक्ष हा सर्व जातीधर्मीयांचा पक्ष आहे असा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी सर्व जातीधर्मांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे निर्देश ना.रामदास आठवले यांनी या बैठकीत दिले.

दलित आदिवासी आणि ओबीसीना खाजगी क्षेत्रात शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करावेत असा महत्वाचा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

12 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago