आरोग्य

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा, करू नका ही चूक, कारण

रात्री झोपण्यापूर्वी पालक आपल्या मुलांना दूध प्यायला देतात. रात्री दूध देणं मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असं पालकांना वाटतं. जर तुम्हीही रात्री असा विचार करून आपल्या मुलांना दूध देत असाल तर आताच सावधगिरी बाळगा. रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

जर तुमचं मुलाचं जर दोन वर्षांपेक्षा जास्त वय असेल आणि त्याला सतत खोकला आणि सर्दी होत असेल तर रात्री त्याला दूध देणं टाळा. जर तुमच्या मुलाला यासोबतच बद्धकोष्ठता आणि थकवा येत असेल, तर ही मिल्क बिस्किट सिंड्रोमची लक्षणं असू शकतात. तुम्हाला या सिंड्रोमबद्दल माहिती असायला हवी. जर तुम्ही रात्री बाळाला गोड दूध दिलं तर त्यामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो. तसेच अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

मिल्क बिस्किट सिंड्रोम म्हणजे काय…

मिल्क बिस्किट सिंड्रोम हा आजार नाही, मात्र रात्री मुलाला दूध आणि स्नॅक्स दिल्याने रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. यासोबतच मुलाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. ही कोणतीही ऍलर्जी किंवा संसर्ग नाही तर तुम्ही तुमच्या मुलाला जे खायला देत आहात त्यामुळे होत आहे.

मुलांना दूध का देऊ नये…

दुधात साखर असते जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते आणि मुलामध्ये हायपरएक्टिव्हिटी निर्माण होऊ शकते. ज्यामुळे मुलाला रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की रात्री झोपण्यापूर्वी बाळाला दूध पाजल्याने त्याला शांत झोप येईल, तर तुम्ही चुकीचे आहात. यामुळे वारंवार झोपमोड होऊ शकते.

वजन वाढणार नाही…

रात्री झोपण्यापूर्वी बाळाला दूध दिलं तर त्याचं वजन वाढेल असा अनेकांचा गैरसमज असतो. पण ते तसं नाही. रात्री बाळाला दूध दिल्याने त्याचं वजन वाढणार नाही.

बॉडी डिटॉक्सिफिकेशन होत नाही…

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर तुम्ही तुमच्या मुलाला दूध दिलं आणि नंतर रात्री झोपवलं तर त्याचं शरीर नॅचरली डिटॉक्सिफाईड होऊ शकत नाही. डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत समस्या येते. यामुळे, जर तुम्ही लहान मुलांना रात्री दूध देत असाल तर ते आताच बंद करा. ज्या मुलांना खोकला आणि सर्दीचा जास्त त्रास होतो त्यांनी रात्री दूध देणं टाळाच. जर तुमच्या मुलालाही अशी समस्या असेल तर काही दिवस रात्री त्याला दूध देऊ नका. तुमच्या मुलाच्या आरोग्यात तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागेल.

दूध देण्याची योग्य वेळ कोणती…

लहान मुलांना दूध देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी. नाश्त्यासोबत दूध द्यावं. सकाळी दूध प्यायल्याने बाळ दिवसभर एक्टिव्ह राहतं आणि दूध सहज पचतं. दूध पचवण्यास कोणतीही अडचण येत नाही. जर तुमचं मूल शाळेत जात असेल तर सकाळी शाळेत जाताना तुमच्या मुलाला दूध पाजावं. यामुळे सकाळी त्याचं पोटही भरलेलं राहील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

21 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago