महाराष्ट्र

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली.

पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे.

त्र्यंबकेश्वरला पंकज आणि अभिषेक हे कारने मंगळवारी सकाळी गेले होते. रात्री ते परतीचा प्रवास करत असताना अचानकपणे कारच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार दुभाजकावर आदळून कोलांटउड्या खात उलटली. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी फाट्यावर धाव घेत पोलिसांना कळवले. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रुपेश मुळाणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

अखेरचा श्वास सोबत घेतला…

पंकज दातीर हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण आणि सहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तर अभिषेक घुले हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबातील तरुण मुले गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज आणि अभिषेक हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघांनी सोबतच अखेरचा श्वास घेतला. अंबड गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पंकज आणि अभिषेक हे दोघे पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यांची ही मैत्री बालपणापासून घट्ट होती. दोघे कायम सोबत असायचे. त्यांचा परिसरात चांगला संपर्कही होता. त्यामुळे दोघांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी लोटली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

1 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago