महाराष्ट्र

‘हे केवळ मंदिर नाही, तर विश्वशांतीचे प्रतीक’; एकनाथ शिंदे

त्रिमंदिरातून विश्वशांतीचा संदेश; ठाण्यात धार्मिक एकतेचा नवा अध्याय सुरू

ठाणे: धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या, अहिंसेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात, असा संदेश देणाऱ्या ठाण्यातील भव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने शहरात धार्मिक एकतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास 1 फेब्रुवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि या पवित्र उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

मंत्रोच्चार, विधी-विधान आणि भक्तिमय वातावरणात हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या वेळी जैन समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक तसेच देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे केवळ मंदिर नसून संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे. अहिंसा, सत्य, आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्ती ही सर्व धर्मांची समान मूल्ये या त्रिमंदिरातून अधोरेखित होतात.”

त्रिमंदिरात एकाच छताखाली सीमंधर स्वामीजी, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि भगवान शिवलिंग यांचे दर्शन घडते. या अनोख्या संकल्पनेमुळे कोणताही भाविक येथे आला तरी ‘हे माझेच मंदिर आहे’ अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते, असे शिंदे यांनी नमूद केले.

या मंदिरामुळे ठाण्याची ओळख केवळ औद्योगिक किंवा सांस्कृतिक शहर म्हणून नव्हे, तर धार्मिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून अधिक दृढ झाली आहे. “हा सोहळा ठाण्यासह महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असेही त्यांनी सांगितले.

दादा भगवान यांच्या प्रेरणेतून आणि दादा भगवान फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराचा उद्देश विज्ञानाच्या माध्यमातून शांती, एकता आणि शाश्वत आनंदाचा प्रसार करणे हा आहे.

या प्रकल्पासाठी दीपकभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष कौतुक केले. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी मंदिर उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व सेवक, स्वयंसेवक आणि भाविकांचे आभार मानण्यात आले. ठाण्यातून विश्वशांती, धार्मिक एकता आणि मानवतेचा संदेश दूरवर पोहोचल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

10 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

10 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

15 तास ago