महाराष्ट्र

उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार

मुंबई: मुंबईत २६ नोव्हेंबर १९९३ रोजीच्या दहशतवादी हल्ला खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून गाजलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासाच्या अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची अलीकडेच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

यानंतर आता उज्ज्वल निकम यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा असल्याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन आहे. मी त्यांना लगेच फोनही केला होता. लोकसभेला थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला, याचे दुःख आम्हा सर्वांनाच होते. उज्ज्वल निकम माझे चांगले मित्र आहेत. ते राज्यसभेवर गेले आहेत. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरील नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल, ते मोठे वकील आहेत, त्यांनी खूप चांगले काम राज्यात आणि देशात केलेले आहे. दहशतवादासंदर्भातील केसेस, देशद्रोह्यांबाबतच्या केसेस ते लढले आहेत. त्यामुळे होऊ शकते. काही अशक्य नाही, असे सूचक विधान गिरीश महाजन केले.

उज्ज्वल निकम इन अन् रक्षा खडसे आउट होणार?

उज्ज्वल निकम यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले, तर एका जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्रीपद येईल, अशा परिस्थितीत रक्षा खडसे यांच्या मंत्रि‍पदाला काही धोका निर्माण होऊ शकेल का, असा सवाल गिरीश महाजन यांना करण्यात आला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मला तसे वाटत नाही. आम्ही पण भाजपाचे दोन लोक इथे आहोत. एकेका राज्याचे तीन-चार मंत्री आहेत. कोणता धोका असेल, असे मला वाटत नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत. कुणाला मंत्री करायचे, कुणाला करायचे नाही. कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे, ते ठरवतील, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यसभेवर नियुक्त चारही सदस्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. विशेषत: निकम यांचा त्यांनी विशेष गौरव केला. नामांकित वकील अशी ओळख असलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत सरकारची बाजू मांडून आरोपींना शिक्षा मिळवून दिली आहे. १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार खून खटला, खैरलांजी हत्याकांड, प्रमोद महाजन खून प्रकरण या खटल्यांत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उत्तर मुंबईमधून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांना यश आले नव्हते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

5 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

5 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

5 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

5 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

5 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

5 तास ago