मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतुन लंडनला रवाना होणार आहेत.त्यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे सुध्दा लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लंडन दौऱ्यात लंडन येथील भारतीय दुतावास येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.तसेच लंडन मधील विविध आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेणार आहेत.लंडन मधील आंबेडकरी कार्यकर्ते गौतम चकवर्ती यांनी साऊथ हॉल आंबेडकर सेंटर येथे आयोजित केलेल्या स्वागत सत्कार समारंभात ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.तसेच दिनांक 18 ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतच्या वतीने लंडन मध्ये आयोजित केलेल्या कोहिनुर पुरस्कार सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यात आवर्जुन उपस्थित राहण्याचे आमंत्रण लोकमत समुहाचे प्रमुख विजय दर्डा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले होते.या निमंत्रणाला मान देऊन ना.रामदास आठवले या पुरस्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
लंडन दौऱ्यात ना.रामदास आठवले पत्रकार, आंबेडकरी, कार्यकर्ते,उद्योजक आणि अनिवासी भारतीयांची ते भेट घेणार आहेत. या दौऱयात ना.रामदास आठवले यांच्या सोबत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…