मुंबई: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि Bigg Boss OTT 3 फेम Chandrika Dixit पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील तिचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे.
दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यामुळे चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या व्हिडिओंमुळे ती अचानक चर्चेत आली आणि त्यानंतर तिला रिअॅलिटी शो Bigg Boss OTT 3 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि पतीसोबतच्या वादामुळेही चर्चेत आहे.
दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये मुलाच्या संगोपनाबाबत बोलताना चंद्रिकाने केलेले विधान सध्या वादाचे कारण ठरत आहे. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, आई होण्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. “जर मला माझ्या मुलाचे संगोपन करण्यासाठी कुणासोबत झोपावे लागले तरीही मी ते करेन, पण माझ्या मुलाला वाढवणारच,” असे तिने म्हटले.
हे वक्तव्य समोर आल्यानंतर मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत, “मुलाचे संगोपन करण्यासाठी तुझ्या मनात पहिल्यांदा हेच का आलं?” असा सवाल केला. तर दुसऱ्याने “सिंपथी मिळवण्यासाठी काहीही बोलू नको,” अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी तिला मेहनत करून पैसे कमवण्याचा सल्लाही दिला.
दरम्यान, चंद्रिका दीक्षित सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. तिचे पती Yugam Gera यांच्यासोबत तिचे संबंध ताणले गेले असल्याच्या चर्चा आहेत. तसेच ती पुन्हा लग्न करणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…