महाराष्ट्र

वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलालाही संपवल

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा किती निर्दयी खुनी होता, हे आता पुढे येत आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने आणखी एक दावा केला असून वाल्मिकने आतापर्यंत २५ तरी खून केले असतील आणि त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असं ते म्हणाले आहेत.

सेवेतून बडतर्फ केलेले पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी हा नवा दावा केला आहे. ते म्हणाले की, वाल्मिक कराडने कमीत कमी २५ तरी मर्डर केले असतील. एका १४ वर्षांच्या मुलाचाही खून त्याने केला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.

कासले पुढे म्हणाले, वाल्मिकने काही लोकांना बॉयलरमध्ये टाकून संपवलं, काहींचे तुकडे करुन नदीमध्ये फेकून दिलं.. तो अतिशय विकृत माणूस आहे. आजही त्याचा मुलगा श्री कराड मला फोन करुन त्रास देतोय. १४ वर्षांच्या मुलाला मारल्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे, असं कासले म्हणाले.

दरम्यान, वाल्मिक कराडने केलेले खून आणि एकूणच परळीमध्ये झालेले खून; या सगळ्या प्रकरणांसाठी एकत्रित एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांची आहे. ते मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देणार आहेत. परळीतली दहशत आता संपत आलेली असली तरी यापूर्वी जे खून झालेले आहेत, त्यांचा ससेमीरा धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळच्या लोकांमागे लागणार आहे. दुसरीकडे महादेव मुंडे खून प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने तसे आदेश दिले होते.

एसआयटीमध्ये कोण?

पूर्वी बीडमध्ये डीवायएसपी म्हणून असलेले आणि सध्या अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक असलेले पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे. कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago