महाराष्ट्र

आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ, दीर्घ लढ्याला मोठं यश

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही समोर आलं.

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

संभाजीराजेंची पोस्ट

दरम्यान, दिल्ली ते नागपूर असा प्रवास करताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे विमानात शेजारी होते. त्यावेळी सरन्यायाधीशांनी आपल्याला ही आनंदाची बातमी दिली. सरन्यायाधीश म्हणाले ‘की, राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे’ असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; अनेक वर्षांच्या लढ्याला यश…

आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी कोल्हापुरातील खंडपीठ महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. वेळेसोबत पैशाचीही बचत त्यामुळे होणार आहे. कोल्हापुरातील खंडपीठाचे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…

3 तास ago

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

16 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

17 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

2 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

2 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

2 दिवस ago