महाराष्ट्र

अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवर वडेट्टीवार आक्रमक; आठ दिवसांत चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिटवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी ऑडिटच्या नूतनीकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. केवळ चौकशीची घोषणा करून आरोग्यमंत्री जबाबदारी झटकू शकत नाहीत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आठ दिवसांत जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे सांगत, दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

२०२२ मधील घटनेचा अहवाल अद्याप नाही

रुग्णालयाच्या पाहणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी २०२२ मधील व्हेंटिलेटरशी संबंधित घटनेचा मुद्दा उपस्थित केला. त्या घटनेची चौकशी झाली, मात्र चार वर्षे उलटूनही अहवाल आला नाही आणि कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

२०२२ मधील घटना आणि सध्याच्या दुर्घटनेतही ‘शिल्लर’ कंपनीच्या व्हेंटिलेटरबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे या उपकरणांची सखोल तपासणी करून ती रुग्णालयातून हटवावीत, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये या कंपनीचे व्हेंटिलेटर वापरले जात असल्याचा दावा करत, ही उपकरणे चायना मेड आहेत का आणि कोणाच्या दबावामुळे त्यांची खरेदी करण्यात आली? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. याबाबत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्या

अमरावतीतील या घटनेचा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आगीच्या घटनेत धाडसाने सहा बालकांचे प्राण वाचवणाऱ्या परिचारिकेच्या कामाची दखल सरकारने घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अमरावती महापालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले, जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखेडे यांच्यासह किशोर बोरकर, अनिकेत ढेंगले, वैभव वानखेडे, वैभव देशमुख आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

4 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

4 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

9 तास ago