क्राईम

गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का; राज्यातील पहिलीच कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. राज्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का लावण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली.

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने भोगावती सहकारी साखर कारखाना, शाहूनगर, परिते परिसरातील एका खोलीवर छापा टाकून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा प्रकार उघडकीस आणला होता. तपासादरम्यान आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अशाच प्रकारच्या गुन्ह्यांतील सहभाग समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीकडून गर्भवती महिलांना हेरणे, गर्भलिंग तपासणीसाठी ग्राहक मिळवणे, बेकायदेशीर सोनोग्राफी करणे आणि त्यानंतर गर्भपाताची व्यवस्था करणे, अशा स्वरूपाचे काम केले जात होते. गर्भपातासाठी लागणारी औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यासह सोनोग्राफी केंद्रांची माहिती मिळविण्याचे कामही टोळीतील सदस्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

११ गुन्ह्यांची नोंद

या टोळीविरोधात २०२० ते २०२६ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ११ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यामध्ये करवीर पोलीस ठाण्यात ७, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात १, राधानगरी पोलीस ठाण्यात २ आणि भुदरगड पोलीस ठाण्यात १ गुन्ह्याचा समावेश आहे.

टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, संघटित पद्धतीने सुरू असलेले गैरकृत्य आणि वारंवार केले जाणारे गुन्हे लक्षात घेऊन करवीर पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रस्तावाची छाननी करून तो विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. कायदेशीर तपासणीनंतर मोक्का कारवाईला मंजुरी देण्यात आली.

मोक्का कारवाईतील ११ आरोपी

स्वप्निल केरबा पाटील (३५, बाळिंगा, ता. करवीर) याच्यावर टोळीप्रमुख म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यासह महेश सुबराव पाटील (३५, सिसे, ता. राधानगरी), श्रीमंत तानाजी पाटील (३७, परिते, ता. करवीर), विजय लक्ष्मण कोळसकर (३९, मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), प्रशांत वसंत जाधव (सिव्हिल, कर्नाटक), दत्तात्रय कृष्णात पाटील (सिसे, ता. राधानगरी), ओंकार गोरखनाथ कराळे (३०, ससे, ता. राधानगरी), सुनील प्रकाश पाटील (३८, सिसे, ता. राधानगरी), अनिल प्रकाश टिपुगडे (४०, भोगावती, ता. करवीर), शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील (४०, इचलकरंजी) आणि अश्विनी गजानन शिंदे (३८, कसबा वाळवे, ता. राधानगरी) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अपर पोलीस अधीक्षक अनुज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपातासारख्या गंभीर प्रकारातून आर्थिक फायदा मिळवणाऱ्या संघटित टोळीवर मोक्का लावल्याने या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील अशा प्रकारच्या टोळीविरोधातील ही पहिली मोक्का कारवाई असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

5 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

5 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

5 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

5 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

10 तास ago