महाराष्ट्र

आमचा संघर्ष नाही, आपसातील संघर्षाने विकासाचा खून होतो; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंसमोर मोठा संदेश

परळी : परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी पशुसंवर्धन तसेच पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा आणि माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना सूचक आणि महत्त्वाचे विधान केले. “मथुरेवर सतत अतिक्रमण केल्यामुळे कृष्णाला द्वारका उभी करावी लागली. आपसातल्या संघर्षामुळे विकासाचा खून होतो. मी मंचावरून सांगते की, आमचा संघर्ष नाही,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

‘संघर्षाची शिकवण मुंडे साहेबांनी दिली’

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंडे साहेबांनी आम्हाला संघर्षाची शिकवण दिली. मला अजितदादांच्या शोकसभेत विधानसभेत बोलायचे होते. इथे देवा भाऊंच्या लाडक्या बहिणीदेखील आल्या आहेत. आता मुख्यमंत्री लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. आपल्याला काम लवकर करायचे आहे. हा शासनाचा पैसा आहे, तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे. येथील विद्यार्थ्यांनी ‘मी शिकलो’ असे अभिमानाने सांगितले पाहिजे.”

यावेळी त्यांनी ग्रामीण उद्योजकांसाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही उल्लेख केला. “मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ग्रामीण उद्योजकांसाठी आता ५० टक्के सबसिडी मिळणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

‘सुनेत्रा वहिनींसोबत अजितदादांचा आशीर्वादही आला’

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “आज इथे सुनेत्रा वहिनीच नाही आल्या, तर अजितदादांचा आशीर्वाददेखील इथे आला आहे. राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मराठवाड्याच्या आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

“कधी काळी एकमेकांच्या विरोधात असलेली दोन कुटुंबे युतीमुळे एकत्र आली. आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार केला. मात्र दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही अनेकदा सोबत प्रवास केला आणि बऱ्याच गप्पाही मारल्या,” असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, “मुंडे साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे,” असे म्हणत पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. परळीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे कुटुंबातील संबंध, महायुतीतील राजकीय समीकरणे आणि विकासाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानांची चर्चा सुरू झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

7 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

7 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

23 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago