महाराष्ट्र

सांगलीत ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रा; भगवा ध्वज विरुद्ध तिरंगा वाद पुन्हा पेटला

 

सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते. मात्र, पदयात्रेत ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवा’ असा संदेश असलेले पोस्टर्स आणि भगवे ध्वज दिसून आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पदयात्रेत सहभागी धारकऱ्यांच्या हातात भगवे ध्वज तसेच भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा होत्या. काही जणांकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही दिसून आले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

अखंड हिंदुस्थानच्या संकल्पनेचा प्रचार

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माहितीनुसार, अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि स्वातंत्र्यानंतरही अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुढे नेण्याचा संदेश देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान, पदयात्रेशी संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले असून त्यातील मजकुरामुळे भगवा ध्वज आणि राष्ट्रध्वजाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसकडून भिडेंवर टीका

या पदयात्रेवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंदे मातरमच्या कथित अवमानाबाबत कारवाईची भूमिका घेतली जाते, मग राष्ट्रध्वजाच्या कथित अवमानाबाबत वेगळी भूमिका का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

भाजपची भूमिका स्पष्ट

दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी या वादावर भूमिका स्पष्ट केली. कोण काय म्हणते याला महत्त्व नसून तिरंगाच भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भगवा हा हिंदू समाजाचा स्वाभिमान असल्याचे सांगतानाच देशाचा अधिकृत राष्ट्रध्वज तिरंगाच असल्याचे गोरे यांनी नमूद केले.सांगलीतील या पदयात्रेनंतर भगवा ध्वज, राष्ट्रध्वज आणि अखंड हिंदुस्थानच्या संकल्पनेवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

6 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

6 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

22 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago